Maharashtra farm loan Saam TV News
Video

Buldhana : कर्जमाफी होणार नाहीच, जिल्हाधिकारीही बोलतायेत राजकीय भाषा

Maharashtra farm loan : कर्जमाफी नाकारल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या वक्तव्याने संतप्त शेतकरी आंदोलनाच्या तयारीत. महायुतीवर पुन्हा दबाव.

Namdeo Kumbhar

No Loan Waiver for Farmers : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. यामुळे महायुती सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील एका भाषणात स्पष्ट केले की, राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सध्या कर्जमाफी शक्य नाही आणि शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्ज परतफेड करावे. या वक्तव्याने शेतकरी संतप्त झाले असून, शेतकरी संघटना महायुतीविरोधात आंदोलन करीत आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवता बँकांचे कर्ज परतफेड करून नवीन पीक कर्ज घेण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी या वक्तव्याला "जखमेवर मीठ चोळणे" असे संबोधत संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT