Toll Plaza Saam tv
Video

महत्त्वाची बातमी! टोल प्लाझावर आजपासून नवे नियम लागू; रोख रक्कम बंद, डिजिटल पेमेंट अनिवार्य

FASTag rules : राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर आजपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. फास्टॅग अनिवार्य करण्यात आला असून यूपीआयद्वारे पेमेंट केल्यास २५% अधिक शुल्क आकारले जाणार आहे.

Namdeo Kumbhar

Toll Plaza Update : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून टोल प्लाझावर रोख रक्कम (Cash) देण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली असून, डिजिटल पेमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) हा निर्णय घेतलाय. NHAI ने टोल प्लाझावर रोख रक्कम देण्याची पद्धत पूर्णपणे बंद कऱण्यात आली. आता डिजिटल पेमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. UPI द्वारे टोल भरल्यास 25 टक्के अधिक शुल्क आकारले जाणार आहे

टोल नाक्यांवर आता रोख स्वरूपात टोल स्वीकारला जाणार नाही. ज्या वाहनांवर फास्टॅग (FASTag) नाही, त्यांना यूपीआय (UPI) द्वारे टोल भरण्याची सोय दिली जाईल. मात्र, यूपीआयद्वारे पेमेंट केल्यास सामान्य टोल दरापेक्षा २५ टक्के अधिक शुल्क आकारले जाणार आहे. जर वाहनाकडे फास्टॅग नसेल आणि चालक यूपीआय पेमेंट करण्यासही असमर्थ असेल, तर त्या वाहनाला टोल प्लाझावरून पुढे जाऊ दिले जाणार नाही. टोल न भरता गेल्यास संबंधितांना ई-नोटीस पाठवली जाईल. या नोटिसीनंतर तीन दिवसांच्या आत टोलची रक्कम न भरल्यास दुप्पट दंड आकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT