नितेश राणे छावा मराठा महासंघ वादग्रस्त वक्तव्य Saam Tv
Video

नितेश राणेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार? छावा मराठा महासंघ आक्रमक VIDEO

Nitesh Rane controversy: मंत्री नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त विधानावरून नेहमीच चर्चेत असतात, मल्हार सर्टीफीकेशन आणि हलाल मटन याबाबत वक्तव्य तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासबाबत यावरून छावा मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. छावा मराठा युवा महासंघाने त्यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

संविधानिक पदावर असताना राणे सतत समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप महासंघाने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते, असा वादग्रस्त जावईशोध लावून त्यांनी दोन समाजांत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महासंघाने लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 नुसार गुन्हा दाखल करण्याची आणि मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT