Nirmala Sitaraman SaamTv
Video

Nirmala Sitharaman : फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; काय म्हणाल्या निर्मला सीतारामन, पाहा Video

Devendra Fadnavis News : भाजपच्या आमदारांची आज विधानभवनात कोअर कमिटीची बैठक पार पडली. यात देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेते पदी आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी फडणवीस यांच्या कामगिरीचं कौतुक केलं.

Saam Tv

भाजपने त्यांचा नेता ठरवला असून भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची उपस्थिती होती. विधानभवनात भाजपा आमदारांची बैठक बुधवारी पार पडली. यात ही निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, विधिमंडळाच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निर्मला सीतारमन यांनी फडणवीस यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेला लागलेला निकाल हा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे. ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. राज्याच्या जनतेचा कौल स्पष्ट आहे. महाराष्ट्राचं डबल इंजिन सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करेल, असं म्हणत त्यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT