Nashik News SaamTv
Video

Nashik News : धक्कादायक! पाच दिवसांचे नवजात बाळ चोरले; नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार, पाहा Video

Nashik District Hospital : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बाळ चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. आज एका महिलेचे पाच दिवसांचे नवजात बाळ अनोळखी महिलेने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Saam Tv

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या पाच दिवसाचं बाळ अज्ञात महिलेनं चोरून नेल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे.

सुमन अब्दुल खान (रा. सटाणा, जि. नाशिक) हिची प्रसूती नुकतीच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात झाली आहे. प्रसूतीनंतर बाळाला आणि आईला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. याकाळात एक अनोळखी महिला बाळाशी खेळण्यासाठी येत होती. ओळख असल्याचे भासवून ती बाळाला खेळवायची. त्यानंतर आज ही महिला बाळाला त्याच्या वडिलांकडे घेऊन जाते म्हणून घेऊन गेली. मात्र ती बाळाला घेऊन निघून गेली. याघटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासासाठी दाखल झाले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT