Corona Virus  AI Image
Video

Corona Virus : कोरोनाचा नवा व्हेरियंट! PJ.2.1 मुळे पुन्हा धडकी; काय आहेत लक्षण? जाणून घ्या

Corona Virus : कोरोनाचा नवा PJ.2.1 व्हेरिएंट चर्चेत! कॅनडात पहिली नोंद, अनेक देशांमध्ये प्रसार. संभाव्य लक्षणे, कोरोना आणि फ्लूमधील फरक तसेच संसर्गापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Alisha Khedekar

कोरोनाच्या पहिल्या महाभयंकर लाटेने जगाचं केलेलं नुकसान आठवून अजूनही धडकी भरते. आता त्याच कोरोनाचा नवा PJ 2.1 हा व्हेरियंट आढळून आला आहे. हा नवीन व्हेरियंट कॅनडात आढळला असून, याची लक्षणे फ्लू सारखीच असल्याने ओळख कठीण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या नव्या व्हेरिएंटचा अनेक देशांमध्ये प्रसार झाल्याचे समोर आले आहे. मे २०२६ मध्ये कॅनडातील ओंटारियो येथे या व्हेरिएंटची पहिली नोंद झाली. त्यानंतर अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियासह काही देशांमध्येही त्याचा फैलाव झाल्याची माहिती समोर आली आहे.

या व्हेरिएंटची लक्षणे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र कोरोना व्हेरिएंटप्रमाणेच यामध्ये पुढील लक्षणे दिसू शकतात. ताप येणे किंवा थंडी वाजणे, खोकला आणि घशात खवखव, नाक वाहणे किंवा बंद होणे,डोकेदुखी आणि अंगदुखी, थकवा आणि अशक्तपणा, काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे या व्हेरिएंटची असून नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छता राखावी आणि लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: स्‍काउट OPला बिग बॉसने दिली मोठी शिक्षा; संपूर्ण सीझनसाठी केलं नॉमिनेट, कधीही होऊ शकतो घराबाहेर!

Maharashtra News Live Update: रत्नागिरीतील महालक्ष्मी मिनी मॉलला भीषण आग

Cleaning Hacks : घरातील कचऱ्याच्या डब्यातून दुर्गंध येतोय का? हे ५ सोपे उपाय नक्की करुन बघा

Indian Railways : ट्रेनच्या खिडकीला काच असूनही लोखंडी जाळी का असते? ९०% लोकांना माहीत नाही यामागचं कारण

Ganesh Naik : मोठी बातमी! मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला भीषण आग, मुंबईत आगीचे सत्र सुरूच

SCROLL FOR NEXT