Nepal Plane Crash Viral Video Saam TV
Video

Plane Crash Video : उड्डाण भरताच अवघ्या १० सेकंदातच विमान कोसळलं; १८ प्रवाशांच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

Nepal Plane Crash : नेपाळमधील विमान अपघाताचा थरारक व्हिडीओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद झालाय. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे.

Satish Daud

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. उड्डाण घेत असताना विमानाला अचानक आग लागली. काही क्षणातच विमान उंच आकाशातून थेट जमिनीवर कोसळलं. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. अजूनही एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं कळतंय.

या विमान अपघाताचा थरारक व्हिडीओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद झालाय. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान काठमांडून येथून पोखराला जाणार होते. या विमानातून १९ प्रवासी प्रवास करीत होते. धावपट्टीवरून सकाळी ११ वाजता विमानाने उड्डाण भरले. मात्र, काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली. बघता-बघता विमान संपूर्ण विमानच धावपट्टीवरच कोसळले.

नेपाळमध्ये विमान अपघाताची ही काही पहिलीच घटना नाही. दरवर्षी देशात किमान एकतरी विमान अपघात होतो. २०१० पासून नेपाळमध्ये आतापर्यंत किमान १२ विमान अपघात झाले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये नेपाळमध्ये असाच एक अपघात झाला होता. ज्यात पायलटसह ७२ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT