नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहचले आहेत. नाशिकमधून अटक केलेल्या तरुणाचा एक साथीदार पुण्यात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संबंधित तरुण हा मूळचा अहिल्यानगर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवार दुपारपासून संबंधित तरुणाचा मोबाईल बंद असल्याचे समजतेय. नाशिक मधील आरोपी खैरनार याच्यासोबत असलेला आणखी एक तरुण हा पुण्याचा असण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध सुरू आहे.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे तीन पथके रवाना झाली आहे. पुणे पोलिसांच्या तीन पथकांकडून संशयिताचा शोध घेण्यात येतोय. नाशिकच्या शुभम खैरनार याच्याशी संशयित तरुणाचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. संबंधित तरुण अहिल्यानगरचा असून त्याने पुण्यातील अनेकांना विविध महाविद्यालयात प्रवेश करून दिल्याचा संशय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.