Sharad Pawar SaamTv
Video

Sharad Pawar : सरकारला विरोधक नकोच, आढाव यांचा आरोप; शरद पवारांचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर

Baba Adhav News : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात तीन दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे. आज शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.

Saam Tv

सरकार जनतेची फसवणूक करत आहे. त्यांना विरोधक नकोच आहेत, अशी टीका करत ईव्हीएममध्ये नागरिकांनी टाकलेलेच मतदान आहे, याचा पुरावा काय? असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी बाबा आढाव यांच्या उपोषण स्थळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी आढाव बोलत होते. तर ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असून सरकारी तिजोरीची लूट सुरू असल्याचा आरोप करत आमचा बाबा आढवा यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. राज्यभरातून या उपोषणाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा देखील यावेळी उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे तीन दिवसापासून सुरू केले आहे. त्यांच्या उपोषण स्थळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. त्यांच्या उपोषण स्थळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. गौतम अदानी यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. अदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिले जात नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याबाबत मी सरकारच्या विरोधात सत्याग्रह करत असल्याचे आढाव यांनी म्हटलं आहे. सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच सांगितले पाहिजे. लोकशाहीतील एक नागरिक म्हणून माझे ते कर्तव्य आहे, असे बाबा आढाव म्हणाले.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT