Sharad Pawar SaamTv
Video

Sharad Pawar News : उद्या मलाही तिकीट त्यांनीच दिलं म्हणतील, शरद पवारांची नाव न घेता अजित पवारांवर फटकेबाजी

Faltan Assembly Constituency : फलटण विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण यांच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रामराजे निंबाळकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच समाचार घेतला आहे.

Saam Tv

फलटण येथील साखरवाडीच्या प्रचार सभेत रामराजे निंबाळकर यांच्यावर केलेल्या टीकेवरून शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समाचार घेतला आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा पार पडली. यावेळी साखरवाडी येथील सभेत अजित पवार यांनी रामराजेंवर केलेल्या टीकेवर शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांचा समाचार घेतलाय. यावेळी त्यांनी 'राज्यातले बडे नेते साखरवाडीला आले होते त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हल्ला चढवला आणि म्हणाले रामराजेंना तिकीट मी दिलं. पक्षाचा अध्यक्ष मी, तिकीट देण्याचा अधिकार माझा. मग यांनीच कसं तिकीट दिलं. उद्या म्हणतील शरद पवारांना देखील तिकीट मी दिलं', अशी टीका करत अजित पवार यांच्यावर फटकेबाजी केलेली दिसली. 'एकमेकांचा सन्मान ठेवण्याची गरज आहे. रामराजे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले ते स्वतःच्या कर्तुत्वावर आलेत. यामुळे कुणी हे केलं ते केलं सांगू नये, अशी जोरदार टीकाही अजित पवार यांचे नाव न घेता शरद पवार यांनी फलटण येथील सभेत केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

SCROLL FOR NEXT