Chh.Sambhajinagar News SaamTv
Video

Chh.Sambhajinagar News : जागावाटपाआधीच महायुतीत मोठं बंड; राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने !

Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच महायुतीमध्ये पहिलं बंड झालेलं बघायला मिळत आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच महायुतीमध्ये पहिलं बंड झालेलं बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या गंगापूर मतदारसंघातून अजित पवार यांचे आमदार सतीश चव्हाण यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने भाजपच्या आमदाराविरोधात दंड थोपटलेले आहेत. त्यामुळे हे पहिलं बंड महायुतीत झालेलं आहे.

एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने राज्याचे दौरे करत आहेत. जागावाटपाचा तिढा सोडणवण्यासाठी बैठका घेत असताना आता त्याआधीच आता बंड करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महायुतीसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने भाजपच्या विरोधात लढण्याची घोषणा केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर मतदारसंघातील प्रशांत बंब 2009 पासून आमदार आहेत. 2 वेळा त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक जिंकली आहे. मात्र आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली असल्याने महायुतीत पहिलं बंड झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT