Ncp Merger Talks: Supriya Sule And Praful Patel Meet In Delhi saam tv
Video

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी दिल्लीत मोर्चेबांधणी? सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये 35 मिनिटे चर्चा

NCP Merger Formula : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात ३५ मिनिटे बैठक झाली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

राष्ट्र्रवादीच्या विलीनीकरणाबाबत दिल्लीमध्ये खलबंत सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली या ३५ मिनिटांच्या बैठकीत दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची बैठक झाली. यामुळे दिल्लीत विलीनीकरणाचा फॉर्म्युला ठरणार का असा सवाल केला जातोय.

दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक

प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, आपल्यापर्यंत कोणत्या प्रकारचा विषय आला नाहीये. विलिनीकरणाबाबत माझ्याशी कोणी बोललेलं नाही, मी तुम्हाला सांगू ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्यादिवशी, त्याच्यानंतर दोन चार दिवसात ज्या काही घटना झाल्या. त्याच्यानंतर मी स्वत: या विषयावर (विलिनीकरण) पडदा टाकलाय, असं म्हणाल्या होत्या. मात्र आज दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये विलीनीकरणाबाबत बैठक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग; दिल्लीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या महत्त्वाच्या बैठका

पुणे पोलिस दलात मोठे खांदेपालट; सहा वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या, प्रशासनात खळबळ

86 देश, 18 भाषा, 150 हून अधिक चित्रपट; गोव्यात जागतिक सिनेमाचा महाकुंभमेळा भरणार

Post Office TD Scheme : १ लाख रुपये गुंतवा अन् ५ वर्षांनी मिळवा तब्बल १,४४,९९५ रुपये; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

Milk Price Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झटका! दूधाच्या दरात मोठी वाढ, नवे दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT