Ncp Merger Buzz: Jayant Patil, Amol Kolhe Meet Sharad Pawar At Silver Oak saam tv
Video

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला वेग? जयंत पाटील,अमोल कोल्हे सिल्वर ओकवर दाखल; शरद पवारांसोबत खलबतं सुरू

NCP Merger Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झाले. सुनील तटकरे यांच्या बारामतीतील भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आलाय.

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूय. दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांनी भेटीगाठींचा सपाटा लावलाय. आज पुन्हा सिल्वर ओक बंगल्यात राजकीय खलबतं सुरू झाल आहेत. शरद पवार गटातील नेते सिल्वर ओकवर दाखल झाली आहेत. जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हेंसह अनेक नेते शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. दरम्यान ही बैठक कोणत्या मुद्द्यावरून होतेय, याची माहिती अद्याप हाती आली नाहीये. परंतु सध्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरूय.

त्याच मुद्यावरून अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांकडे भेटीची वेळ मागितलीय. त्याआधी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे सिल्वर ओकवर दाखल झालेत. दरम्यान आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली. जवळपास दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाली. सुनेत्रा पवार उद्या पत्रकार परिषद घेणार असून त्यात ते विलीनीकरण निर्णयाची घोषणा करतील असं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhai Dooj Horoscope: भाऊबीजेचा सण ठरणार 'या' राशींसाठी खास; कुटुंबाचा पाठिंबा, तर काहींना मिळणार यशाची संधी

Maharashtra News Live Update: अमोल कोल्हे आणि जयंत पाटील पवारांच्या भेटीला, आज पुन्हा सिल्वर ओकवर खलबतं

Cancer Screening: वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने 'ही' महत्त्वाची टेस्ट केलीच पाहिजे; अन्यथा...

ऐन दिवाळीत राजकीय धमाका! निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते पक्षाला ठोकणार रामराम!

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

SCROLL FOR NEXT