Sharad Pawar NCP SaamTv
Video

Sharad Pawar : जयंत पाटलांसमोरच पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना केली प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी, पाहा Video

Shard Pawar NCP Party Meeting : मुंबईत आज शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक् बोलावली होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकारी बदलण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Saam Tv

वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष द्या अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. गुरुवारी मुंबईत शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जयंत पाटील यांच्या समोरच पदाधिकारी बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी रोहित पवार आणि रोहित पाटील यांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसह फ्रंटलचे पदाधिकारी बदला अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर जयंत पाटील यांच्या एवजी प्रदेशाध्यक्ष पद अजून कोणाला द्यावं अशी मागणी सातत्याने होत आहे. त्याच अनुषंगाने आज बैठकीत जयंत पाटील हे या पदासाठी योग्य नाहीत असा याचा अर्थ नाही, मात्र आता नवीन चहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकसुरात केली आहे. तसंच आता रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यावर देखील मोठ्या जबाबदारीची कामं देण्यात यावी अशीही मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT