Rajendra Shingane SaamTv
Video

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Ajit Pawar Called MLA Rajendra Shingane : अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू असून शिंगणे यांची नाराजी दूर करण्यासाठी अजितदादांनी त्यांना फोन केला आहे.

Saam Tv

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांची समजूत काढण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र शिंगणे हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर ते शरद पवार यांच्या गटात जाऊन तुतारी हाती घेणार असल्याचं देखील बोललं जात होतं. या अनुषंगाने त्यांच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. विधानसभेला शिंगणे हे शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर लढणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. गायत्री शिंगणे यांनी देखील याबाबत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार यांच्याकडून राजेंद्र शिंगणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी त्यांनी शिंगणे यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आहे. मात्र आता यानंतर अजितदादा राजेंद्र शिंगणे यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील का, शिंगणे काय निर्णय घेतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Maharashtra News Live Update: पाटबंधारे विभागातील 314 कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

मध्यरात्री सरकारी रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू, ६ गंभीर, ३६ चिमुकल्यांना वाचवले

Medicine Storage Tips : घरात 'या' ७ ठिकाणी कधीच गोळ्या-औषधं ठेवू नका! कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT