NCP (AP) Candidate List SaamTv
Video

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

Assembly Election Candidate List : 38 नावांच्या पहिल्या यादीनंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या गटाने आपल्या 7 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

Saam Tv

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना यंदा अनुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली.

या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 38 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता आज नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारीची संधी देत 7 उमेदवारांची दुसरी यादी अजित पवार यांच्या गटाने जाहीर केली आहे. यात झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व, निशिकांत पाटील - इस्लामपूर, संजयकाका पाटील - तासगाव, प्रताप चिखलीकर - लोहा कंधार, सुनील टिंगरे - वडगाव शेरी, ज्ञानेश्वर कटके - शिरुर हवेली, सना मलिक - अनुशक्तीनगर यांच्या नावाचा समावेश आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT