Jayant Patil On Dhananjay Munde Saam Tv News
Video

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित यांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

"धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मी साक्षीदार आहे. एवढ्या वर्षानंतर त्यांचा प्रवेश हा आत्मघातकी प्लान होता? असं वक्तव्य करणं हेच हास्यास्पद आहे..."

Rachana Bhondave

Jayant Patil: दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांचा प्रवेश हा आमचा आत्मघाती प्लॅन होता, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मी साक्षीदार आहे. एवढ्या वर्षानंतर त्यांचा प्रवेश हा आत्मघातकी प्लान होता? असं वक्तव्य करणं हेच हास्यास्पद आहे..."असं ते म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांनी व्यक्त होताना गौरव केला आहे. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना अनेकांनी विरोध केला होता, याचा देखील शोध घ्यावा लागेल. राष्ट्रवादी मधील फुटीनंतर धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात असावं. लोकांसाठी झगडणारा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. टार्गेट करायचं म्हटल्यानंतर असा कुणीतरी जबाबदार व्यक्ती जो भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरू शकतो त्यामुळं टार्गेट केलं जाऊ शकतं. असं देखील त्यांनी म्हटलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

SCROLL FOR NEXT