Ajit Pawar News SaamTv
Video

Ajit Pawar : राज्याचा मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, पाहा Video

Maharashtra CM : राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेलं नसल्याने विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर राज्याचं मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यावर आता अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

Saam Tv

राज्यात सरकार स्थापन होईल तेव्हाच राज्यमंत्री पदांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे, असं अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तसंच अंदाजे ५ डिसेंबरला शपथविधी सोहळा होईल असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे. त्यामुळे यातून अजित पवार यांनी राज्य सरकार स्थापनेची सर्व चर्चा पूर्ण झाली असल्याचे सूचक संकेतच दिलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाला आज अजित पवार यांनी पुण्याच्या फुले वाडा येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्तास्थापनेच्या निर्णयावर भाष्य केलं.

राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेलं नसल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र अजित पवार यांनी दिलेल्या तपशीलानंतर आता या चर्चाना पूर्ण विराम लागला आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित झालं असून इतर दोन पक्षांचे दोन उपमुख्यमंत्री असतील, असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही राज्यासाठी ज्या योजना आखण्याचा विचार केला आहे, त्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

8th Pay Commission : जुन्या पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! PM मोदींकडे थेट मागणी; 8व्या वेतन आयोगात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT