Chhagan Bhujbal saamtv
Video

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Maharashtra Assembly Results : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून केवळ 86 मतांनी आघाडी मिळतांना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून केवळ 86 मतांनी आघाडी मिळतांना दिसत आहे. मतमोजणीतील सुरुवातीच्या कलात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे आघाडीवर असले तरी त्यांना केळव 86 मतांची आघाडी मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आज कोण सत्ता स्थापन करणार याचा निकाल लागणार आहे. त्यासाठी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता सुरुवातीचे कल यायला लागले आहेत. यात महायुतीला आघाडी मिळतांना दिसत आहे. महायुतीचे उमेदवार सकाळच्या सुरुवातीच्या कलातून आघाडीवर असून यात येवला मतदारसंघातून छगन भुजबळ हे आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भुजबळ हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात माणिकराव शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात आहे. छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील मराठा आरक्षणाच्या वादाचा परिणाम या निकालावर होईल का, हे पाहाणं आता महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी सुरुवातीला छगन भुजबळ यांना काही अंशी दिलासा मिळतअसल्याचं दिसत आहे. मात्र ही केवळ 86 मतांची आघाडी असल्याने येथील लढत चुरशीची होणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT