Mahayuti  Saam Tv
Video

'शिंदे गट अजितदादांना सत्तेतून बाहेर काढणार', Jayant Patil यांच्या वक्तव्याने राजकारण तापलं

Jayant Patil on Ajit Pawar: गडचिरोलीमध्ये अजित पवार यांनी असं वक्तव्य करुन बाबा अत्राम आणि त्यांच्या मुलीला घरात फूट पडू नका असा संदेश दिला असेल पण त्यांना त्यांच्या बद्दल काही पश्चाताप झाला आहे असेल याबद्दल मला माहित नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar News : एकनाथ शिंदे यांचा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. अजित पवार यांना सत्तेबाहेर काढल्यास भाजपासोबत युती करताना अधिक जागा मिळतील, असा त्यांचा प्लॅन आहे. एकूणच त्यांच्या या कृतीने सरकार कस सुरू आहे हे स्पष्ट होतं, असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.

गुलाबराव पाटील यांनी अशी टीका करणे योग्य नाही. पण अशी टीका करुन महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढून शिवसेनाला जास्त जागा महायुती मिळाव्या असा काही त्यांचा प्लान असेल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

काल गडचिरोलीमध्ये अजित पवार यांनी असं वक्तव्य करुन बाबा अत्राम आणि त्यांच्या मुलीला घरात फूट पडू नका असा संदेश दिला असेल पण त्यांना त्यांच्या बद्दल काही पश्चाताप झाला आहे असेल याबद्दल मला माहित नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

फडणवीस यांच्यावर टीका -

जंयत पाटील यांनी वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते स्वत:लाच अभिमन्यु म्हणून घेत आहेत. म्हणजे ते स्वत: म्हणत आहेत की ते अभिमन्यु आहेत. अभिमन्युला चक्रव्यूह भेदता आले किंवा नाही हे सगळ्यांनी पाहीले. त्यांना त्यांच्याच बरोबरचे सहकारी अडचण करत आहे. त्यांनी सगळा ताबा एकनाथ शिंदे यांच्या हातात आल्याचे दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT