Nawab Malik News SaamTv
Video

Nawab Malik : पवार-शिंदे संपर्कात? मलिकांचा खळबळजनक दावा!, पाहा Video

Nawab Malik Latest Statement : नवाब मलिक यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या संपर्कात असून त्यांच्यात खलबत सुरू असल्याचा धक्कादायक दावा केल्याने आता चर्चा रंगल्या आहेत.

Saam Tv

शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी चाललं आहे, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं देखील मलिक यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक खलबतं यानिमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू असलेली दिसत आहे. अशातच आता मानखुर्द शिवाजीनगरचे विधानसभेचे उमेदवार नवाब मलिक यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या खळबळजनक दाव्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 'शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या संपर्कात असून त्यांच्यात काही तरी सुरू आहे', असा दावा नवाब मलिक यांनी केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. इतकंच नाही तर 'विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात अजित पवार हे किंगमेकर असतील, निकालानंतर राज्यात काय होईल ते सांगता येत नाही.' असंही मलिक यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT