Kalamboli News SaamTv
Video

Navi Mumbai : धक्कादायक! पोषण आहार नव्हे जीवाशी खेळ! चिमुकल्यांना दिलेल्या रव्याच्या उपीटात निघाल्या अळ्या | VIDEO

Kalamboli Anganwadi News : नवी मुंबई येथील अंगणवाडी क्रमांक ५५ मध्ये मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. याठिकाणी मुलांना दिलेल्या पोषण आहारात अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Saam Tv

नवी मुंबई येथील अंगणवाडी क्रमांक ५५ मध्ये मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अंगणवाडीतील शालेय पोषण आहारात अळ्या आढळून आल्या आहेत. नवी मुंबईच्या कळंबोलीत असलेल्या अंगणवाडी क्रमांक ५५ मध्ये हा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

अंगणवाडीतील चिमूकल्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात अळया आढळल्या आहेत. कळंबोली येथील अंगणवाडी क्रमांक ५५ येथील ही घटना आहे. या घटनेमुळे पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. अंगणवाडीतील बालकांना पोषण आहारात रव्यापासून तयार करण्यात आलेल्या उपीटचे वाटप करण्यात आले होते. या रव्याच्या उपीटमध्ये अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बालिकेच्या आहारातील अळ्या पालकांच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आल्याने सदरची घटना उघडकीस आली. त्यानंतर पालकांनी याबाबत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

8th Pay Commission : जुन्या पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! PM मोदींकडे थेट मागणी; 8व्या वेतन आयोगात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT