Cab and auto rickshaw drivers protest during a nationwide strike against illegal bike taxi services and app-based transport companies. Saam Tv
Video

बेकायदा बाइक टॅक्सीविरोधात वातावरण तापलं; कॅब आणि रिक्षाचालकांनी पुकारला देशव्यापी बंद

Nationwide Cab And Auto Drivers Strike Against Bike Taxis: बेकायदा बाइक टॅक्सी आणि खाजगी अ‍ॅपआधारित कंपन्यांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात 7 फेब्रुवारी रोजी कॅब व रिक्षाचालकांचा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.

Omkar Sonawane

खाजगी अ‍ॅपआधारित वाहतूक सेवांच्या मनमानीविरोधात कॅब व रिक्षा चालकांनी शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी देशव्यापी एकदिवसीय बंद पुकारला आहे. महाराष्ट्र कामगार सभा तसेच भारतीय गिग कामगार मंच यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळण्यात येणार आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, देशात सुरू असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवांकडून मनमानी कारभार केला जात असून त्यामुळे पारंपरिक कॅब आणि रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या खाजगी कंपन्यांचे भाडे आकारणीचे धोरण अन्यायकारक असल्याचा आरोप चालक संघटनांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ओला, उबर, रॅपिडो कॅब आणि रिक्षा चालक 7 फेब्रुवारीला कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. परिवहन विभागाकडून खाजगी कंपन्यांवर ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप ही संघटनांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शाहू महाराजांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT