Nashik News SaamTv
Video

Suhas Kande : शिंदेंच्या आमदाराच्या अंगरक्षकाची भाईगिरी; थेट हॉटेलच्या वेटरवरच ताणलं रिव्हॉल्व्हर | Video

ShivSena MLA sSecurity Guard : शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदाराच्या अंगरक्षकाने थेट एका हॉटेलमधील वेटरवरच रिव्हॉल्व्हर ताणलं असल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघड झाला आहे. नाशिक रोड येथे असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

Saam Tv

नाशिकच्या नाशिक रोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना जिल्ह्यातील एका आमदाराच्या अंगरक्षकाने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. विशाल झगडे असं या अंगरक्षकाचं नाव आहे. विशाल झगडेवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय.

विशाल झगडे हा नाशिक ग्रामीण पोलिसात दलात कार्यरत आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा तो अंगरक्षक आहे. सागर निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक रोड येथील हॉटेल रामकृष्णमध्ये ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलिस विशाल झगडे हा हॉटेलमध्ये दोन साथीदारांसह जेवण करण्यासाठी आला होता. त्याने हॉटेलमधील वेटर सिरॉन शेख यास बोलावले. त्यावेळी बोलताना संशयित झगडे याने वेटरला शिवीगाळ केली. त्यावरून वेटर बोलला असता, संशयित झगडे याने त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर ताणली आणि त्यास शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकारामुळे वेटरसह हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली. संशयित पोलिस झगडे याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्यासह शस्त्र दाखवून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवार याबाबत पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT