Illegal Abortion centre Busted Saam Tv
Video

Nashik News : २७ वर्षांपासून सुरू होतं अवैध गर्भपाताचं केंद्र; धाड टाकली अन् धक्काच बसला, पाहा VIDEO

Illegal Abortion centre Busted In Mahatma Nagar : महात्मानगरमध्ये अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश करण्यात आलाय. औषधांचे १८ किट देखील जप्त करण्यात आलेत.

Rohini Gudaghe

मुंबई : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मागील २७ वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र तेथे सुरू असल्याचं समोर आलंय. नाशिकच्या महात्मानगर परिसरातील हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं. पालिका वैद्यकीय विभाग आणि अन्न, औषध प्रशासनाने आज छापा टाकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नाशिकमध्ये अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झालाय. हे केंद्र मागील २७ वर्षांपासून सुरू असल्याचं समोर आलंय.

पथकाच्या छाप्यानंतर धक्कादायक माहिती समोर समोर आलीय. महात्मानगरमध्ये २७ वर्षांपासून हा अवैध दवाखाना सुरू होता. पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे १९९७ नंतर दवाखान्याची नोंदणीच नाही. गर्भपात करण्याच्या बंदी असलेल्या औषधांचे १८ किट या कारखान्यात सापडले आहेत. गर्भलिंग चाचणी करण्याचं प्रमाणपत्र देखील नसतांना देखील गोरखधंदा सुरू होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT