Jayant Patil News Update SaamTv
Video

Nashik News : नाशकात दराडे - पाटील भेट; बघा काय झाली चर्चा

Assembly Election : ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची भेट घेतली आहे.

Saam Tv

ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून दराडे उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरस रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वी नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे यांच्या नावाची ठाकरे गटाकडून चर्चा होती. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटणार असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि त्यांचा मुलगा कुणाल दराडे यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. जयंत पाटील हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आले असताना ही भेट दराडे यांनी घेतली.

विधानसभा निवडणुकीचे बीगुल वाजणार आहे. त्यामुळे सगळ्या इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: भारताऐवजी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला? विराट कोहलीने स्वतःच केला खुलासा

Voter List Fraud: व्होट चोरीचा आणखी एक पुरावा; बदलापूरमध्ये १७ हजार बाहेरील मतदार

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

SCROLL FOR NEXT