Nashik Crime News 
Video

Nashik Crime : कोयत्याने सपासप वार, मध्यरात्री राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, नाशिकमध्ये खळबळ | VIDEO

Nashik Crime News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याची नाशिकमध्ये हत्या करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून बुधवारी रात्री टोळक्याने कोयत्याने वार करत त्यांचा जीव घेतला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहे.

Namdeo Kumbhar

Nashik Crime Latest News : नाशिक राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचा सख्खा भाऊ प्रशांत जाधव यांची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री टोळक्याने त्यांच्या घरासमोर कोयत्याने सपासप वार करत त्यांचा जीव घेतला. नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे. बुधवारी रात्री दोन भावांच्या हत्येनं नाशिक हादरले होते. नाशिकमधील हे दुहेरी हत्याकांड वर्चस्वाच्या वादातून झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलेय.

नाशिक पोलिसांच्या तपासात हत्याकांडाचे कारण उघडकीस आले आहे. वर्चस्वाच्या वादातून जाधव बंधूंची हत्या करण्यात आली. आंबेडकरवाडी येथे दोन्ही भावाची हत्या केली होती. उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन्ही भावांवर धारधार शस्राने वार केले होते. उमेश जाधव होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शहर उपाध्यक्ष होते. या प्रकरणी सागर गरड, अनिल रेडकर, सचिन रेडकर, योगेश रोकडे आणि अविनाश उशिरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

SCROLL FOR NEXT