Nashik News Today Saam TV News
Video

Nashik Lok Sabha: नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम? NCP पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनं राजकीय चर्चांना उधाण

Nashik News Today: नाशिकमधून भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर आता नेमकं बैठकीचं प्रयोजन काय? यावरुन चर्चांना उधाण आलंय.

Saam TV News

नाशिक : नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशातच नाशकातून मोठी अपडेट समोर आलीय. नाशकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. नाशिकमधून भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर आता नेमकं बैठकीचं प्रयोजन काय? यावरुन चर्चांना उधाण आलंय. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं सांगण्यात येतं. नाशिकचा महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नेमकी का बोलवण्यात आली? याबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेनेनं नाशिकच्या जागेवर दावा केला होता. हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याची शक्यता शिवसेनेच्या नेत्यांनी बोलून दाखवली होती. अशात आता राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: SIR विरोधात इंडिया आघाडी वज्रमूठ आवळणार

Rent House: भाड्याचे घर रिकामं करताय? मालकाला चावी देण्यापूर्वी हे काम जरूर करा, नाहीतर...

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंमुळे भाजप जिवंत, नाहीतर अस्तित्वच राहिलं नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Blood cancer: ब्लड कॅन्सरची सुरुवात होताच दिसतं 'हे' 1 लक्षण; याकडे दुर्लक्ष करणं पडेल भारी

Good News: मोठी बातमी! बाळ जन्माला येताच मिळणार सोन्याची अंगठी, या राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT