nashik news  saam tv
Video

Nashik News: साधू महंतांची उपस्थिती, मंत्रोच्चारणं नाशिकचा गोदाकाठ दुमदुमला|VIDEO

Holy Chants Echo in Nashik as CM Fadnavis Prepares for Kumbh Mela Review: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आहे, या पार्श्वभूमीवर सर्व साधू महंत हे नाशिकमध्ये दाखल झाले आहे.

Omkar Sonawane

मंत्रभूमी म्हणून ओळख असलेली, प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी पुन्हा एकदा अध्यात्मिक रंगात रंगली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख साधू-महंत नाशिकमध्ये दाखल झाले असून, गोदावरीच्या तीरावर आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली आहे.

निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर या तीनही प्रमुख आखाड्यांचे साधू-महंत नाशिकमध्ये पोहोचले असून, त्यांनी आज गोदा घाटावर गोदावरी आरतीमध्ये सहभाग घेतला. मंत्रोच्चारांनी नाशिकचा परिसर दुमदुमून गेला होता. गोदावरीच्या किनाऱ्यावर भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. निसर्गरम्य वातावरण आणि अध्यात्मिक ऊर्जा यामुळे भाविक तल्लीन झाले होते.

दरम्यान, येणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते सर्व साधू-महंतांसोबत विशेष बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या अधिकृत तारखा जाहीर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT