Nashik SAAM TV
Video

Nashik : नाशिकमध्ये पावसाचा कहर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याचा वेढा, जिल्ह्याचा पाणीसाठा ९७ टक्क्यांवर | VIDEO

3,000 Cusecs Released from Gangapur Dam: रामकुंड, गोदाघाट परिसराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा बसला असून,नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गंगापूर धरणातून तब्बल ३ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. परिणामी रामकुंड आणि गोदाघाट परिसराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा बसला असून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गंगापूर, त्र्यंबकेश्वर आणि हरसूल भागात पावसाचा जोर कायम असतानाच शनिवारीच्या तुलनेत रविवारी पावसात थोडीशी घट झाली. मात्र धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने शहरासह जिल्ह्यातील अनेक नद्या आणि धरणं तुडुंब भरली आहेत. सध्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला असून जिल्ह्याचाही पाणीसाठा ९७ टक्क्यांवर आहे. त्यामुळे पुढील पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दक्षतेचे आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme: मोठी बातमी! या सरकारी योजनेत आता १५०० नव्हे तर ₹२५०० मिळणार; राज्य सरकारची घोषणा

Today Weather : महाराष्ट्रात जम्मू काश्मीरचा फील! तापमान घसरलं, 'या' ठिकाणाचा पारा ५ अंशावर, मुंबई-पुणेकर थंडीने गारठले

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

Rules for Roti: रात्री भिजवून ठेवलेल्या कणकेची पोळी सकाळी का खाऊ नये?

Corn Bhel Recipe: घरच्या घरी चटपटीत मक्याची भेळ कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT