Nashik Godavari River flood saam tv
Video

Nashik Flood : गोदावरीला पूर, अनेक वाहनं अडकली | VIDEO

Nashik Vehicle Stranded in Godavari River : नाशिकमध्ये गोदावरी नदीला पुन्हा पूर आलाय. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड परिसरात पाण्यात वाहनं अडकली होती. ती वाहनं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढली.

Nandkumar Joshi

अभिजीत सोनावणे, नाशिक | साम टीव्ही

नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी ओसंडून वाहत आहे. रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. दुपारनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार आहेत. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये रामकुंड परिसरात वाहनं अडकलेली होती. ती बाहेर काढण्यात आली. नदीकाठावर ही वाहनं पार्क करण्यात आली होती. गोदावरीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळं ही वाहनं अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. ती वाहनं पाण्यातून बाहेर काढली. गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं गोदा काठावर वाहने पार्क करू नयेत, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT