Nashik Crime  Saam tv
Video

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Nashik Crime News : बातमी आहे तुम्हाला हादरवून टाकणारी. कौटुंबीक वादातून पतीने आत्महत्या केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र पतीने गळफास घेतल्यानंतर पत्नीने थेट लटकत्या मृतदेहाखाली दुर्गापूजा मांडलीय. पण हा जादुटोण्याचा प्रकार आहे का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Vishal Gangurde

भरत मोहोळकर, साम टीव्ही

नाशिक : पतीचा लटकलेला मृतदेह आणि त्याच मृतदेहासमोर पत्नीने मांडलेली दुर्गाष्टमीची पूजा.... या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेनं नाशिक हादरलंय.

नवनाथ घायवट हे आपल्या पत्नीसोबत राहत होते. 11 सप्टेंबरला घरात दुर्गाष्टमीची पूजा आयोजित करण्यात आली होती. मात्र पूजेच्या दिवशीच नवनाथ आणि त्याच्या पत्नीचा वाद झाला. कौटुंबीक वादातून नवनाथ घायवट यांनी किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या पत्नीनं मात्र मृतदेहासमोरच पूजा मांडली. हे कमी होतं की काय, या महिलेने नवनाथ घायवट यांना पुन्हा जीवंत करण्यासाठी अंगाला हळद कुंकूही लावलं. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. नवानाथ यांचा मृत्यू अंधश्रद्धेतून तर घडला नाही ना? अशी शंका व्यक्त होतीय. तर पोलिसांनी नवनाथ घायवट यांचीपत्नी मनोरुग्ण असल्याचं सांगितलंय..

नवनाथ घायवट यांची मुलं पुण्याला राहतात. पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून नवनाथ घायवट यांनी आत्महत्या केली. मात्र मृत पतीच्या पायाशी पत्नीनं पूजा मांडल्यानं हा जादुटोणा किंवा अंधश्रद्धेचा प्रकार आहे का? याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World War 3: जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मस्क यांचा इशारा, जगाला टेन्शन

Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

SCROLL FOR NEXT