nashik news  saam tv
Video

Nashik News: राज ठाकरेंना मातोश्रीचं निमंत्रण द्या; उद्धव ठाकरेंना कळकळीची विनंती करणारं बॅनर चर्चेत, VIDEO

Uddhav Thackeray to invite Raj Thackeray to Matoshree: राज्यभरात सध्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली असताना आता नाशिकमध्ये शिवसैनिकांनी बॅनर लावून उद्धव ठाकरे यांना भावनिक साद घातली आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि मला एकत्र यायला कुठलीही अडचण नसल्याचे सूतोवाच केले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या. अशातच मनसेचा एकेकाळी बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये एका बॅनरची चर्चा रंगत आहे.

नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी बॅनर लावून उद्धव ठाकरे यांना मनोमिलनासाठी विनंती केली.

आम्हाला आमिष दिले गेले.. मोठ्या मोठ्या ऑफर आल्या. दबाव टाकला.

पण साहेब आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही. तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो. आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरे यांना मातोश्रीचे आमंत्रण द्या व महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या ही कळकळीची विनंती अशा मजकुराचा बॅनर सध्या नाशिकमध्ये सर्वांचेच लक्ष वेधत आहे. मात्र, आता उद्धव ठाकरे शिवसनिकांच्या विनंतीला मान देतील का हे बघणं औत्सूक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT