Nashik Saam TV
Video

Nashik : नाशिकच्या अंबडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ | VIDEO

Minor Boys Create Panic in Ambad : नाशिकमधील अंबडच्या आजादनगर भागात अल्पवयीन गुंडांनी तलवारी, कोयते घेऊन धुडगूस घातला आहे. दोन कार, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकी अशा एकूण आठ वाहनांची तोडफोड करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकमधील अंबड आजादनगर परिसरात गावगुंडांनी दहशत माजवत तलवारी व कोयत्यांच्या जोरावर आठ वाहनांची तोडफोड केली आहे. दोन कार, एक टेम्पो, रिक्षा आणि तीन दुचाकी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले असून, काही घरांवर दगडफेकही करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.संध्याकाळच्या सुमारास हातात तलवारी आणि कोयते घेऊन अल्पवयीन तरुणांचं टोळकं गल्ल्यांमधून फिरत होतं. त्यांनी आरडाओरड करत घरांच्या काचा फोडल्या, वाहनांवर हल्ले केले आणि रस्त्यावर गोंधळ घातला.

स्थानिक नागरिकांनी या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, "गावात पोलिसांचा धाकच उरलेला नाही," असा आरोप केला आहे.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT