mumbai- bengaluru highway Saam Tv
Video

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक, अडीच तासांपासून मुंबई- बंगळुरू महामार्ग पूर्णत: बंद; VIDEO

mumbai- bengaluru highway traffic jam: नसरापूर प्रकरणावरून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे मुंबई -बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या अडीच तासांपासून वाहतूक ठप्प आहे.

Priya More

नसरापूर प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुंबई- बंगळुरू महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत आहेत. वडगाव पूल ते नवले पुलावर दोन्ही बाजूला ग्रामस्थांकडून रास्तारोको आंदोलन केले जात आहे. या आंदोलनामुळे गेल्या अडीच तासांपासून मुंबई- बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्पर झाली आहे.

नसरापूर प्रकरणातील पीडितेचे नातेवाईक आणि गावकरी आंदोलन करत आहेत. त्यांनी जोपर्यंत ठोर निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. वडगाव ब्रिज येथे हॉटेल सुवर्णा समोर सुरू असलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे तसेच साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गिका पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी वडगाव ब्रिजकडे येणे टाळावे. कृपया सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा. रास्तारोको आंदोलन संपुष्टात येण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT