Nasarapur Case Updated Saam TV
Video

Nasarapur Case: नसरापूर घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा रास्तारोको, नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी; पाहा VIDEO

Pune Navale Bridge: नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. संतप्त ग्रामस्थांनी नवले पूलावर रास्तारोको आंदोलन सुरू केले.

Priya More

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये ६५ वर्षीय व्यक्तीने ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेवरून नसरापूरमधील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांनी मुंबई- बंगळुरू महामार्गावरील नवले पूलावर रास्तारोको केला. आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पीडित मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. या रास्तारोको आंदोलनामुळे नवले पूलावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याठिकाणी दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पीडित मुलगी नसरापूरला आजोळी आजीकडे आली होती. त्यावेळी आरोपीने चार वर्षांच्या चिमुकलीला वासरू दाखवतो सांगत गोठ्यात नेले. त्याठिकाणी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिची हत्या केली. त्याने तिचा मृतदेह गोठ्यात शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालं त्यामुळे ही घटना उघडकीस आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT