Navi Mumbai BJP workers resigned saam tv
Video

Navi Mumbai BJP News | नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, कारण काय?

ठाण्यातील उमेदवारीचा तिढा सुटला असला तरी वेढा मात्र कायम आहे. नरेश म्हस्केंना नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. काही पदाधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्यासमोरच राजीनामे दिले.

Saam TV News

नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. ठाण्यातून शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यानं ते नाराज आहेत. म्हस्के यांना उमेदवारी दिलेली पसंत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. संजीव नाईक यांच्यासारखे उमेदवार असताना म्हस्के यांना उमेदवारी का दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी नाराज झाले. संजीव नाईक यांना उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. पण म्हस्केंना उमेदवारी दिली. गणेश नाईक यांना भेटण्यासाठी पदाधिकारी गेले. त्यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. म्हस्के यांचे काम करणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोल्यात धक्कादायक निकाल; भाजपचे ५० नगरसेवक विजयी; काँग्रेस, वंचित अन् ठाकरेसेनेला किती जागा? पाहा आकडेवारी

Chandrapur Election: पाच आमदार असूनही चंद्रपुरात भाजप फेल; काँग्रेसचा दणदणीत विजय

बारामतीत बसपाचा 'हत्ती' सुसाट; अवघ्या २१ वर्षांची तरुणी नगरसेवक बनली

India Vs Pakistan: दुबईत अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये तुफान वाद, नेमकं काय घडलं? वाचा प्रकरण...

Konkan Tourism : रत्नागिरीत लपलाय सुंदर किनारा, अनुभवाल कोकणातील अस्सल सागरी सौंदर्य

SCROLL FOR NEXT