PM Narendra Modi receiving global acclaim for leadership, tops international approval ratings once again. Saam Tv
Video

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

Narendra Modi Global Approval Rating 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे. ७५% लोकांच्या समर्थनासह त्यांनी इतर जागतिक नेत्यांना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे.

Omkar Sonawane

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट या बिझनेस इंटेलिजन्स कंपनीने नुकतीच जागतिक नेत्यांची मान्यता अप्रूव्हल रेटिंग यावर आधारित यादी जाहीर केली आहे. या यादीत नरेंद्र मोदी यांनी तब्बल ७५ टक्के लोकांच्या समर्थनासह अव्वल स्थान पटकावले आहे.

बीजेपीचे नेते अमित मालवीय यांनी ही माहिती शेअर करत म्हटले आहे की, एक अब्ज भारतीयांचे प्रेम आणि जगभरातील कोट्यवधी लोकांचा आदर असलेले नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मॉर्निंग कन्सल्टच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल ट्रॅकरमध्ये टॉप स्थान मिळवले आहे. ते जगातील सर्वाधिक रेटिंग मिळवणारे आणि विश्वासार्ह नेते आहेत. सशक्त नेतृत्व, जागतिक प्रतिष्ठा आणि सुरक्षित भारत हेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. ही सर्वेक्षण माहिती ४ ते १० जुलै २०२५ या कालावधीत घेतली गेली होती. या सर्वेनुसार, मोदींना ७५ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे, जे इतर जागतिक नेत्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.

दक्षिण कोरियाचे ली जे-म्युंग – ५९%

अर्जेंटिनाचे जेवियर मिलेई – ५७%

कॅनडाचे मार्क कार्नी – ५६%

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ ४४% रेटिंग मिळाले असून ते आठव्या क्रमांकावर आहेत. तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ४०% रेटिंग मिळाले असून त्या दहाव्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT