narayan raane Saam Tv
Video

Narayan Rane: उद्धव ठाकरेंनी मला फोन केला आणि विनंती केली... नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, VIDEO

Maharashtra Politics: राणे कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, अशातच नारायण राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Omkar Sonawane

सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान यांच्या रहस्यमय मृत्यूनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकरणाला आता पाच वर्षे पूर्ण झाली असून त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते.

त्या वेळेस भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. मंत्री नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियान मृत्यू प्रकरणात हात असल्याचा आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत मला फोन केला होता. त्या वेळी त्यांनी सांगितले की तुम्हालाही मुलं आहेत आणि मलाही मुलं आहेत. कृपया दिशा सालियान प्रकरणात पत्रकार परिषदेत आदित्यचं नाव घेऊ नका अशी माझी विनंती आहे. असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 तास ठाण्यातच ठेवले; 73 वर्षीय नागरिकाला ठाण्यातच ब्रेन स्ट्रोक, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखल

Skin Care : शरीरावरील स्ट्रेच मार्क 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, वेळीच घ्या जाणून

Nepal : ६ हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू; नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना

LPG सिलेंडर ते रेल्वे तिकीट; १ ऑगस्टपासून देशभरात होतील ५ मोठे बदल

SCROLL FOR NEXT