Nanded Rain Saam Tv
Video

Nanded Rain : मुसळधार पावसाने पिकं भुईसपाट; नांदेडमध्ये साडेतीन लाखहेक्टर नुकसानीचा अंदाज, पाहा VIDEO

Three and half lakh hectares of damage due to flood : नांदेडमध्ये मुसळधार पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जवळपास साडेतीन लाख हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय.

Rohini Gudaghe

मुंबई : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. तीन दिवस पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं होती. काल ३ सप्टेंबरच्या रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतलीय. त्यामुळे नदी नाल्यांचा पूर ओसरण्यास सुरुवात झालीय. जनजीवन आता पूर्व पदावर येण्यास सुरुवात झालीय. या पुराच्या पाण्यामुळे मात्र शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविलाय.

आज अनेक मंत्री, नेते नांदेड जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. प्रशासन देखील या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात करणार असल्याची माहिती मिळतेय. पावसाने दुष्काळाचं सावट दूर केलं परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय. पिकं भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झालंय. या पुरामुळे साडेतीन लाखहेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; आता क्रीडा खातं कोणाकडे? जाणून घ्या

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! महायुती सरकारला मोठा धक्का; माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

SCROLL FOR NEXT