Nanded Rain  Saam Tv
Video

Nanded Rain : नांदेडमध्ये मुसळधार पाऊस; ५० ते ६० गावांचा संपर्क तुटला, VIDEO मधून पावसाचं रौद्ररूप पाहा

Asana river floods Nanded To Wasmat connectivity cut : नांदेडमध्ये मुसळधार पावसाने ५० ते ६० गावांचा संपर्क तुटलाय. आसना नदीला देखील पूर आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आलाय. यामुळे नांदेड ते वसमतचा संपर्क तुटला असल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. आसना नदीच्या पुलावर या पूराचं पाणी आलेलं आहे. त्यामुळे नादेड आणि वसमतचा संपर्क तुटलाय. आसना नदीचं पात्र दुथडी भरून वाहत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. जवळपास ५० ते ६० गावांचा नांदेडशी असलेला संपर्क तुटलेला आहे. अद्यापही पावसाने उसंत घेतली नाही.

नांदेड जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविली आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेलगाव(खुर्द)आणि शेलगाव(बुद्रुक) या गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला. या दोन गावांचा मागील ४८ तासांपासून संपर्क तुटलाय. गावाच्या बाजूने मेंढला नाला आहे. समोर आसना नदीला हा नाला जाऊन मिळतो. परंतु आसना नदीला मोठा पूर आल्याने या नाल्याचं पाणी शेवगावात शिरलंय. नागरिकांची मोठी तारांबळ या पावसामुळे उडाल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेले 130 मोबाईल मालकांच्या हाती

SCROLL FOR NEXT