Nanded News SaamTv
Video

Nanded News : हॉर्न वाजवल्याचा राग आला, धावत्या कारवर चढला अन् कारचालकाला धु धु धुतला | VIDEO

Viral Video News : नांदेडमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. हॉर्न वाजवल्याचा राग आला म्हणून एका तरुणाने थेट कारच्या टपावर चढून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Saam Tv

नांदेडच्या आयटीआयच्या चौकात हॉर्न वाजवल्याचा राग आला म्हणून तरुणाने थेट कारवर चढून चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. डॉक्टर प्रकाश नागरगोजे यांना ही मारहाण करण्यात आली आहे. लोहा तालुक्यातील मालकोळी येथे त्यांचं रुग्णालय आहे. नेहमी प्रमाणे ते आज चारचाकी वाहनातून हॉस्पिटला जातं होते. गाडीबरोबर साडेअकरा वाजता आयटीआय चौकात आली. त्यानंतर त्यांनी पुढील वाहनांना हॉर्न दिला. त्यावरून एका तरुणाला राग आल्याने त्याने थेट कारच्या टपावर चढून डॉक्टर नागरगोजे यांना मारहाण करायला सुरुवात केली. एखाद्या अॅक्शन मुव्हीच्या सीनसारखा हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे काही काळ सगळेच चक्रावलेले बघायला मिळाले. मारहाणाच्या प्रकारामुळे नागरगोजे पोलिस स्टेशनला पोहचले. पण हॉर्न वाजवल्यानं तापलेल्या या पठ्याचा व्हिडीओ चांगलांचं व्हायरल होतोय. पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कारच्या टपावर आलाय असंच हा व्हिडिओ बघताना वाटतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT