Nanded News SaamTv
Video

Nanded Crime : नांदेड शहर गोळीबाराने हादरल, गोळीबारात दोन जण जखमी | Video

Nanded City Shoot out : नांदेड शहर गोळीबाराने हादरलं आहे. नांदेड शहरातील दुरुद्वारा परिसरात गोळीबार झाला आहे. ३ ते ४ जणांनी हा गोळीबार केला आहे.

Saam Tv

नांदेड शहर गोळीबाराने हादरलं आहे. नांदेड शहरातील दुरुद्वारा परिसरात गोळीबार झाला आहे. ३ ते ४ जणांनी हा गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नांदेड शहरात सकाळी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात ही घटना घडली आहे. एका खून प्रकरणातील आरोपी २२ जानेवारीपासून पॅरोलवर जेल मधून बाहेर आला होता. त्याच्यावर आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रावर गोळीबार करण्यात आला. दोघांनाही गोळी लागल्यामुळे जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार नेमका कशामुळे झाला? किती आरोपी होते? हे अद्याप स्पष्ट झाले नसून लवकरच या घटनेचा तपास केला जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor Photos : चुराके दिल मेरा गोरिया चली, श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य

मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंच्या कारवर भीषण हल्ला, ओबीसी मेळाव्याला जात असताना काचा फोडल्या

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मन्याड नदीला पूर

Laxman Hake : अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर हल्ला, मनोज जरांगे म्हणाले...

Beed Rain : बीडमध्ये मुसळधार पाऊस, पोलिस स्टेशनमध्ये साचले गुडघाभर पाणी |VIDEO

SCROLL FOR NEXT