nanded crime  saam tv
Video

Nanded News: नांदेड हादरलं!भरचौकात तरुणाला बेदम मारलं; धक्कादायक कारण समोर|VIDEO

Crime News:नांदेडमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

नांदेड: शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. निलेश कल्याणकर या तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रॉडने जबर मारहाण केली. निलेश आपल्या मित्रासोबत पायी जात असताना, तिघेजण दुचाकीवरून येऊन थेट रस्त्यावर उतरले आणि रॉडने अचानक हल्ला चढवला.

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून, या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी मारहाण सुरू असताना अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, एकाही नागरिकाने पुढे येत हस्तक्षेप केला नाही, ही बाब विशेष चिंतेची ठरते. नांदेड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT