MVA Press Conference SaamTv
Video

VIDEO : मविआच्या पत्रकार परिषदेत ठाकरे-कॉंग्रेस वाद चव्हाट्यावर; पटोले राऊतांवर बरसले

Congress-Thackrey Clashes In Press Conference : संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केल्यानंतर आता नाना पटोले यांनी देखील भर पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Saam Tv

महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि कॉंग्रेसमधील वाद भर पत्रकार परिषदेत चव्हाट्यावर आला आहे. खासदार संजय राऊत यांच्यावरची नाराजी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवल्याने पत्रकार परिषदेतच आघाडीतील बिघाडी सगळ्यांच्या समोर आली आहे. यावेळी मविआतील नेते देसाई आणि आव्हाडांकडून नाना पटोले यांना यावेळी समजवण्याचा प्रयत्न देखील केला गेलेला दिसून आला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी आज सकाळी नाना पटोले याच्यावर टीका केली होती. त्यानंतर मविआच्या पत्रकार परिषदेतच नाना पटोले यांनी राऊतांवरची आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवल्याने आता ठाकरे गट आणि कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. ''संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना जुमानत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे.'' असं यावेळी बोलताना नाना पटोले यांनी म्हंटलं. त्यानंतर अनिल देसाई आणि आव्हाड यांनी पटोले यांना समजवण्याचा प्रयत्न केलेल्या दिसून आला. दरम्यान, आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Maharashtra Politics: मोठी बातमी! संभाजीनगरमध्ये २३ नगरसेवक अपात्र ठरणार? प्रशासनाकडून नोटीस जारी; कारण काय?

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

SCROLL FOR NEXT