Farmers gather in huge numbers on the Nagpur-Hyderabad Highway during Bachchu Kadu’s loan waiver protest march toward CM Fadnavis’ residence. Saam Tv
Video

नागपूर-हैदराबाद महामार्गावर हायव्हॉल्टाज मोर्चा; हजारो शेतकऱ्यांचा मुख्यंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच, VIDEO

CM Devendra Fadnavis Ramgiri Residence: नागपूर-हैदराबाद महामार्गावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानाकडे कूच सुरू आहे.

Omkar Sonawane

शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरमध्ये होणाऱ्या महा एल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा-नागपूर मार्गावर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलक कोणत्याही परिस्थितीत नागपूर शहरात प्रवेश करू नयेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरी पर्यंत पोहोचू नयेत, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली होती.

वर्धा-नागपूर महामार्गावर ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आल्या होत्या, वाहनांची कसून तपासणी केली जात होती. आंदोलकांची गर्दी वाढू नये म्हणून नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना नियोजनपूर्वक मार्गदर्शन केले जात होते. गरज पडल्यास आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या “आपली बस” सेवेची मदतही घेण्यात आली असताना आता बच्चू कडू यांच्या मोर्चाने हजोरोंच्या संख्येने जमा झालेले पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बुटीबोरी परिसरात आंदोलकांच्या वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: हिवाळ्यात शरिराला हळद लावल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update : मुंढवा जमीन प्रकरणाचे मूळ मालक पुणे पोलीस आयुक्तालयात

टेकऑफ घेताच विमान कोसळले; १४ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO

Mental health issues: मुलांच्या मनात नेमकं काय सुरु आहे? तज्ज्ञांनी सांगितलेल्या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Curl Eyelashes : फिरायला जाताना डोळे आकर्षित हवेत? मग, फॉलो करा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT