Video

MLC Election: नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा उलटफेर; भाजपचे टेन्शन वाढलं, लीड घटली

Maharashtra MLC Election: नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीत नाट्यमय वळण आले असून, भाजप उमेदवार सुधाकर कोहाले यांची आघाडी कमी होऊन ती सुमारे १,२०० मतांवर आली आहे.

Bharat Jadhav

राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेली विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचलीय. नागपूर पदवीधरच्या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा मताधिक्य 4 हजाराहून घटून केवळ 1200 मताची आघाडी राहिलीय. नितेश कराळे यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमात काँग्रेस उमेदवार ॲड अभिजीत वंजारी यांच्या मतांमध्ये वाढ झालीय. भाजपाचे सुधाकर कोहळे आघाडीवर असले तरी त्यांना विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या पसंती क्रमासाठी नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांची मोजणी सुरू झाली. या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपाच्या सुधाकर कोहळे यांची आघाडी लक्षणीयरीत्या घटली. भाजपाचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यामध्ये आता केवळ १२०० मतांची आघाडी राहिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rock Salt Vs Sea Salt: सैंधव मीठ, समुद्री मीठ की इतर कोणते मीठ? रोजच्या जेवणासाठी कोणते मीठ वापरावे?

Pratap Asbe Death News: राजकारणाचा सखोल अभ्यासक हरपला! ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन

Matheran Train : घाटमार्ग पुन्हा गजबजणार! माथेरानची राणी शुक्रवारपासून पुन्हा धावणार, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

Linen Saree Designs: महिलांसाठी खास लिनन साड्यांच्या डिझाईन्स , हे 5 पॅटर्न ट्रेडिंगमध्ये

Maharashtra News Live Update: सांगलीत ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT