Nagpur SAAM TV
Video

Nagpur : दुचाकी जाताना अचानक १३० वर्षे जुनी भिंत कोसळली, नागपूरमधील काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

130-year-old wall falls Nagpur : तब्बल १३० वर्षे जुनी असलेली एम्प्रेस मिलची भिंत अचानक कोसळली आहे.सुदैवाने, भिंत कोसळण्याच्या वेळी तिथून जात असलेला एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपुरात एम्प्रेस मिल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल १३० वर्षे जुनी असलेली एम्प्रेस मिलची भिंत अचानक कोसळली आहे. या घटनेत चार ते पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, भिंत कोसळण्याच्या वेळी तिथून जात असलेला एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, फुटेज आता व्हायरल होत आहे. अचालक झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच जोरदार झालेल्या पावसामुळे ही जुनी भिंत कमजोर झाली असावी अशी चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT