Nagpur violence News 
Video

Nagpur Clash : बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवली, माझ्याकडे १५० व्हिडीओ भाजप आमदाराचा गंभीर आरोप | VIDEO

Nagpur Rada: बाहेरून आलेल्या लोकांनी नागपूरमध्ये दंगल घडवल्याचा आरोप भाजप आमदाराने केला. नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ४७ जणांना ताब्यात घेतले आहे.

Namdeo Kumbhar

Nagpur violence News : उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारी रात्री हिंसाचार झाला. दोन गटामध्ये हाणामारी, वाद आणि दगडफेकीची घटना घडली. नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून जमावबंदी लावण्यात आली आहे. बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवल्याचा आरोप नागपूर मध्यचे आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे.

महाल परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा परिसर असेल.राम मंदिर गल्ली, चित्रा टॉकीज आणि इतर भागात बाहेरून आलेल्या नागरिकांनी प्रचंड प्रमाणात दडगफेक केली आहे. गाड्या पेटवल्या आहेत. घरे जाळली आहे, गाड्याची जाळपोळ केली आहे. अग्निशामन दल आग विझवण्यासाठी आले, त्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याची माहिती आहे. माझ्याकडे १५० पेक्षा जास्त व्हिडीओ आहेत. सुरूवातीला पोलिसांचे प्रमाण कमी होते, पण आता पोलिसांची संख्या वाढली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैणात आहे. पण बाहेरून येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांची घरे पेटवली.. ठरवून त्यांनी घरावर दगडफेक केल्याची माहिती आहे, असे आमदार प्रवीण दटके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : रत्नागिरीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या टँकरचा आठ दिवसात सलग दुसऱ्यांदा अपघात

डोंबिवलीत भयंकर घटना! क्रिकेट खेळण्यापासून रोखलं, अल्पवयीन मुलाचा सुरक्षारक्षकावर हल्ला

भयंकर! रोज दारू का पितेस? भडकलेल्या बायकोने नवऱ्यावर केला चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT