Ashish Deshmukh Bike Stunt Saam Tv
Video

Ashish Deshmukh: नागपुरमध्ये भाजप आमदाराचा धावत्या बाईकवर स्टंट, कारवाई होणार का? पाहा VIDEO

Ashish Deshmukh Bike Stunt Video: नागपुरमधील भाजप आमदाराचा बाईकवर स्टंट करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हर घर तिरंगा रॅलीदरम्यान या आमदाराने बाईकवर स्टंट केला. या आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Priya More

नागपुरमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांच्या बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांना ७ हजारांचा दंड लावण्यात आला. तर दुसरीकडे सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुख हे बाईक चालवताना वाहतून नियमांचे उल्लंघन करून स्टंट करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 'हर घर तिरंगा यात्रा' दरम्यानचा त्यांचा बाईक स्टंट करतानाचा हा व्हिडिओ आहे. भाजप आमदाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विना हेल्मेट आमदार बाईकवर उभे राहून स्टंट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक म्हणजे पोलिस अधिकारी त्यांच्या बाईकवर मागे बसला आहे. एकीकडे सर्वसामान्यांना वाहतुकीचे नियम दाखवणारा पोलिस विभाग आता आमदार आशिष देशमुख यांच्या विना हेल्मेट आणि बाईक चालवताना स्टंट करतानाच्या या व्हायरल व्हिडीओनंतर कारवाई करणार का? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. आता ट्रॅफिक पोलिस आमदारावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT